पुणे : दरोडेखोराचा पोलिसांवर गोळीबार
By Admin | Updated: November 1, 2016 15:35 IST2016-11-01T09:25:05+5:302016-11-01T15:35:45+5:30
पुणे व सातारा येथील बँक दरोड्यातील आरोपीने पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना चाळीसगाव येथे घडली.

पुणे : दरोडेखोराचा पोलिसांवर गोळीबार
>ऑनलाइन लोकमत
पुमे, दि. १ - श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण गावातील बँक दरोड्यातील आरोपी सचिन अप्पा ईथापे (वय २६) याच्यावर मंगळवारी सकाळी ७ वाजता चाळीसगाव येथे धुळे रोड परिसरात पुन्शी पेट्रोल पंपाजवळ तो राहत असलेल्या घरात गोळीबार करण्यात आला. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना त्याचा शोध घेत चाळीसगाव येथे आलेल्या पुणे एलसीबी पोलिसांच्या टीमने ही कारवाई केली..
गेल्या अनेक वर्षापासुन पोलिस त्याचा शोध घेत होते. तो चाळीसगाव येथे असल्याची खबर मिळताच पोलिस तेथे पोहेचले व त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत त्याच्यावर फायर केले असता त्याच्या डाव्या पायाला गोळी लागली. यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर आरोपी बँक दरोडा प्रकरणातील सराईत गुन्हेगार आहे. दरम्यान या परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.