पुणे - सोमनाथ गिरम यांच्या उपचारासाठी विद्यापीठाकडून आर्थिक मदत

By Admin | Updated: September 22, 2016 21:58 IST2016-09-22T21:58:09+5:302016-09-22T21:58:09+5:30

राज्याच्या कमवा व शिका योजनेच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर पदी नियुक्त झालेल्या सोमनाथ गिरम यांचा अपघात झाल्याने ते सध्या संचेती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Pune - Financial assistance from the University for the treatment of Somnath Giram | पुणे - सोमनाथ गिरम यांच्या उपचारासाठी विद्यापीठाकडून आर्थिक मदत

पुणे - सोमनाथ गिरम यांच्या उपचारासाठी विद्यापीठाकडून आर्थिक मदत

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 22 - राज्याच्या कमवा व शिका योजनेच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर पदी नियुक्त झालेल्या सोमनाथ गिरम यांचा अपघात झाल्याने ते सध्या संचेती रुग्णालयात उपचार घेत आहेत. गिरम यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना एक लाख रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय गुरूवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेतला.

आर्थिक परिस्थिती हालाखीची असली तरीही जीद्द आणि कष्टाच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहचता येते. याचे उत्तम उदाहरण सोमनाथ गिरम यांनी दाखवून दिले. गिरम यांनी चहा विकून सी.ए.परीक्षेत यश संपादन केले. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या यशाची दखल घेवून कमवा व शिका योजनेच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडरपदी त्यांची नियुक्ती केली.परंतु, काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे झालेल्या एका अपघातात त्यांच्या मनक्याला जोरदार धक्का बसला. सध्या त्यांच्यावर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गिरम हे विद्यापीठाशी संलग्न गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी रुग्णालयात भेट घेतली होती.त्यावेळी गिरम यांनी आर्थिक मदतीबाबत विनंती केली होती. 

 
डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, सोमनाथ गिरम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. तसेच त्याची शासनाच्या कमवा व शिका योजनेच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडरपदी नियुक्त झाली आहे. गुरूवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत सोमनाथला एक लाख रुपये मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 
आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. विद्यापीठाने मदत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी विद्यापीठाचा आणि कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांचा अत्यंत आभारी आहे.
- सोमनाथ गिरम ,ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर,कमवा व शिका योजना,महाराष्ट्र शासन 

 

Web Title: Pune - Financial assistance from the University for the treatment of Somnath Giram