पुण्यात डॉक्टर बापाची लेकीसह विष पिऊन आत्महत्या

By Admin | Updated: May 4, 2017 22:06 IST2017-05-04T21:17:04+5:302017-05-04T22:06:58+5:30

ई-कॉमर्स कंपनीत पैशाच्या गुंतवणूकीने बसलेला आर्थिक फटका आणि पत्नीशी पटत नसणे या कारणास्तव पिसोळी येथील राहत्या घरी

In Pune, doctors used to take lewd poison and commit suicide | पुण्यात डॉक्टर बापाची लेकीसह विष पिऊन आत्महत्या

पुण्यात डॉक्टर बापाची लेकीसह विष पिऊन आत्महत्या

ऑनलाइन लोकमत

पुणे/उंड्री, दि. 4-  ई-कॉमर्स कंपनीत पैशाच्या गुंतवणूकीने बसलेला आर्थिक फटका आणि पत्नीशी पटत नसणे या कारणास्तव पिसोळी येथील राहत्या घरी बाप-लेकीने विष पिऊन आत्महत्या केली. फ्लँटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारील रहिवाश्याने पोलिसांना माहिती कळविल्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करण्यापूर्वी वडिलांनी पाच पानी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली.

डॉ. किरण देवेंद्र पाटील ( वय 61 रा. किंग्सटन एलिसिया सोसायटी, पिसोळी) आणि नियाता किरण पाटील ( वय 18रा. किंग्सटन एलिसिया सोसायटी, पिसोळी) अशी मृत बापलेकींची नावे आहेत. शेजा-यांना फलँटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने  त्यांनी पोलिसांना कळविले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गोवेकर, उपनिरीक्षक पावसे, गणेश कुल्लाळ, रविंद्र भोसले, रमेश राठोड, सचिन शिंदे,विजय गायकवाड, अमोल शिंदे हे घटनास्थळी पोहचले. फ्लँटचा दरवाजा कोणीही  उघडत नसल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले.

दरवाजा तोडल्यानंतर दोघांचे मृतदेह खुर्चीत बसलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेह सडल्यामुळे आठ दिवसांपूर्वीच दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.  पाटील यांचे कुटुंब मूळचे ठाण्याचे असून, काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त ते पुण्यात आले होते. एका खासगी कंपनीत काम करीत असलेले डॉ. किरण पाटील नोकरीतून निवृत्त झाले होते. मुलगी एका महाविद्यालयात अकरावी वर्गात  शिक्षण घेत होती. आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये  ई-कॉमर्स कंपनीत पैशाची गुंतवणूक केल्याचा आर्थिक फटका आणि पत्नीशी पटत नसणे याचा उल्लेख करण्यात आला आहे. पत्नीने मार्च 2015 मध्ये  कौटुंबिक हिंसाचार( 498 कलम) अंतर्गत पाटील यांच्याविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.  दोन वर्षांपासून ती मुंबई येथे वास्तव्यास आहे. आठ महिन्यांपासून ते पिसोळी
 येथे राहाण्यास होते.  मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल मिळणे अद्याप बाकी आहे.

Web Title: In Pune, doctors used to take lewd poison and commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.