पुण्याच्या उपमहापौरांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By Admin | Updated: May 16, 2017 10:11 IST2017-05-16T09:39:51+5:302017-05-16T10:11:37+5:30
पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

पुण्याच्या उपमहापौरांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 16 - पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते घराजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना सकाळी 8 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुबी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
मात्र उपचारांना प्रतिसाद देण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यात भाजप बरोबर युती केल्यानंतर रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांना उपमहापौर बनण्याची संधी मिळाली होती. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असलेले नवनाथ कांबळे रामदास आठवले यांचे निकटचे स्नेही होते.
महाविद्यालयीन काळातच त्यांनी सामाजिक कामाला सूरूवात केली याआधी दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विद्यार्थ्यांसाठी बरेच काही करण्याचा त्यांचा मानस होता मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.