पुणे - 'शो रुम'ला तोरण लावताना खाली पडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 10:38 IST2016-10-21T10:38:44+5:302016-10-21T10:38:44+5:30

दिवाळीसाठी 'शो रुम'ला इलेक्ट्रीक तोरण लावत असताना अचानक तोल जाऊन खाली कोसळला.

Pune - The death of the teenager fell down when he shot down the showroom | पुणे - 'शो रुम'ला तोरण लावताना खाली पडून तरुणाचा मृत्यू

पुणे - 'शो रुम'ला तोरण लावताना खाली पडून तरुणाचा मृत्यू

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २१ - दिवाळीसाठी 'शो रुम'ला इलेक्ट्रीक तोरण लावत असताना अचानक तोल जाऊन खाली पडल्यामुळे एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी वारजे माळेवाडी येथे ही घटना घडली. ऋषिकेश पायगुडे असे मृत तरुणाचे नाव असून तो अवघा २७ वर्षांचा होता. 
 
दिवाळी सणासाठी शो रुमच्या सजावटीचे काम सुरु होते. त्यावेळी ऋषिकेश इलेक्ट्रीकचे तोरण लावण्यासाठी चढला होता. अचानक त्याचा तोल गेला व दुस-या मजल्यावरुन तो थेट खाली पडला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. 
 
पण तो पर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  वारजे माळेवाडी येथील दुचारी शो रुममध्ये ही दुर्देवी घटना घडली. वारजे पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Pune - The death of the teenager fell down when he shot down the showroom