पुण्यात माकपाच्या कार्यालयावर हल्ला
By Admin | Updated: September 3, 2014 02:46 IST2014-09-03T02:46:11+5:302014-09-03T02:46:11+5:30
येथील आप्पा बळवंत चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयावर दहा ते पंधरा तरुणांच्या जमावाने दुपारी अडीचच्या सुमारास हल्ला केला.

पुण्यात माकपाच्या कार्यालयावर हल्ला
पुणो : येथील आप्पा बळवंत चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयावर दहा ते पंधरा तरुणांच्या जमावाने दुपारी अडीचच्या सुमारास हल्ला केला. कार्यालयातील खुच्र्या व इतर साहित्यांची त्यांनी प्रचंड नासधूस केली.
हल्लेखोर तरुणांनी कार्यालयातील तिघा कार्यकत्र्यावर शाई फेकली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकत्र्याकडून हा हल्ला झाल्याचा आरोप माकपा नेते अजित अभ्यंकर यांनी केला आहे.
दुपारी दहा-पंधरा जणांचा जमाव अचानक कार्यालयावर चालून आला. त्यांनी सामानाची नासधूस करण्यास सुरूवात केली. ते मराठी आणि दक्षिण भारतीय भाषेमध्ये बोलत होते. कार्यालयातील कर्मचा:यांनी आरडाओरडा करताच आजूबाजूचे लोक गोळा होऊ लागल्याचे पाहून हल्लेखोरांनी पळ काढला. 15 ते 2क् मिनिटे गोंधळ सुरू होता. मोडतोड सुरू असताना हल्लेखोरांनी आरएसएसचे स्वयंसेवक असल्याचा उल्लेख केल्याचे माकपाच्या कार्यकत्र्यानी सांगितले.
केरळच्या घटनेची प्रतिक्रिया?
केरळमध्ये माकपा कार्यकत्र्याच्या हल्ल्यात आरएसएसच्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. त्याची प्रतिक्रिया म्हणून पुण्यात हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. केरळमधील कन्नूर जिल्ह्यात माकपा व आरएसएस कार्यकत्र्यामध्ये कायम संघर्ष होत असतो. (प्रतिनिधी)
उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनेकडून हा हल्ला झाला असून त्याचा निषेध करत असल्याचे अजित अभ्यंकर यांनी सांगितले. केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारला 1क्क् दिवस पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर माकपाच्या कार्यालयावर हल्ला करून त्याचे ‘सेलिब्रेशन’ झाले आहे. हा हल्ला सर्वच लोकशाहीवादी शक्तींना दिलेला इशारा असल्याचे अभ्यंकर म्हणाले.