पुण्याच्या नगरसेवकांची चेन्नई पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2015 00:51 IST2015-12-17T00:51:04+5:302015-12-17T00:51:04+5:30
महापालिकेच्या वतीने चेन्नईतील पूरग्रस्तांना दीड कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या या सूचनेला नगरसेवकांनी मान्यता दिली.

पुण्याच्या नगरसेवकांची चेन्नई पूरग्रस्तांना मदत
पुणे : महापालिकेच्या वतीने चेन्नईतील पूरग्रस्तांना दीड कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या या सूचनेला नगरसेवकांनी मान्यता दिली.
राष्ट्रवादीच्या नगसेवकांनी त्यांचे मासिक मानधनही निधीत जमा करण्यास संमती दिली. पानशेत पुराच्या वेळी देशातील अन्य राज्यांबरोबरच तामिळनाडूनेही पुण्याला मोठी मदत केली होती. आपत्तीच्या प्रसंगी मदत करण्याची पुण्याची परंपरा आहे, असे शिंदे यांनी सांगितले. सभागृह नेते बंडू केमसे यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधनही त्यात जमा करावे, असे सांगितले. १५७ नगरसेवकांचे मिळून १ कोटी ५७ लाख रुपये निधी जमा होणार आहे. हमाल पंचायतीचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी यापूर्वीच महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे ५० हजार रुपयांचा धनादेश जमा केला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या वतीने २ कोटी रुपये चेन्नई पूरग्रस्तांना देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)