चोरीच्या संशयावरुन पुण्यात अल्पवयीन मुलाला जाळलं
By Admin | Updated: January 14, 2016 15:34 IST2016-01-14T12:38:24+5:302016-01-14T15:34:14+5:30
चोर समजून जमावाने अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करत नंतर त्याला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कसबा पेठ परिसरात घडली आहे.

चोरीच्या संशयावरुन पुण्यात अल्पवयीन मुलाला जाळलं
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १४ - चोर समजून जमावाने अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करत नंतर त्याला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कसबा पेठ परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, अन्य फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
पीडित अल्पवयीन मुलगा कसबा पेठ परिसरात उभ्या असलेल्या गाडयांच्या कडेला उभा राहून लघवी करत होता. त्यावेळी काही जणांनी त्याला पाहिले. हा मुलगा गाडयांचा बॅटरी चोर असावा असा स्थानिकांना संशय आला. त्यांनी या मुलाला हटकले व मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर काही जणांनी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले व त्याला पेटवून दिले. यामध्ये हा मुलगा ६५ टक्के भाजला असून, त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे.