पुण्यात पेट्रोलपंप कामगाराला मारहाण करून 23 लाखांची लूट

By Admin | Updated: July 10, 2017 15:54 IST2017-07-10T15:54:22+5:302017-07-10T15:54:22+5:30

बँकेत 23 लाखाची कॅश घेऊन जाणा-या पेट्रोल पंप चालकाच्या कामगारावर चौघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून लुटले

In Pune, a bootload of 23 lakh looted the petrol pump worker | पुण्यात पेट्रोलपंप कामगाराला मारहाण करून 23 लाखांची लूट

पुण्यात पेट्रोलपंप कामगाराला मारहाण करून 23 लाखांची लूट

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - आंबेगाव बुद्रुक येथे बँकेत 23 लाखाची कॅश घेऊन जाणा-या पेट्रोल पंप चालकाच्या कामगारावर चौघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून लुटले. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली असून घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. 
 
विजयकुमार बाबुराव बिराजदार (वय 40), असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलधारे पेट्रोल पंप चालकाचे दोन कामगार बँकेत कॅश भरण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. मात्र, पंपापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावरच पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी तिक्ष्ण हत्याराने वार करत मारहाण करून लुटून हल्लेखोर पसार झाले आहे.
 
दरम्यान, भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

Web Title: In Pune, a bootload of 23 lakh looted the petrol pump worker