पुणे - बंगळुरु महामार्गावर टँकर उलटल्याने वाहतुकीची कोंडी
By Admin | Updated: August 27, 2016 16:56 IST2016-08-27T16:56:09+5:302016-08-27T16:56:09+5:30
पुणे-बंगळुरु महामार्गावर टँकर उलटला असल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. रॉकेल घेऊन जाणारा टँकर उलटून अपघात झाला आहे

पुणे - बंगळुरु महामार्गावर टँकर उलटल्याने वाहतुकीची कोंडी
>- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - पुणे-बंगळुरु महामार्गावर टँकर उलटला असल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. रॉकेल घेऊन जाणारा टँकर उलटून अपघात झाला आहे. होनगा गावाजवळ ही घटना घडली आहे. टँकरमधून रॉकेल बाहेर पडत असल्याने पोलिसांनी वाहतूक पुर्णपणे थांबवली आहे. वाहूतक थांबवली असल्या कारणाने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अग्निशमन दलाकडून टँकर हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.