शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:45 IST

Pune Accident Case: या एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराने पोखरून काढलेली सगळी व्यवस्था चव्हाट्यावर आलेली आहे. हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही मान्य करावं लागेल, असा टोला सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी लगावला. 

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना  सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या घटनेवरून गृहमंत्रालयाच्या कारभाराचे वाभाडे काढत असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. सगळंच जर मी करायचं असेल, तर मी पुन्हा म्हणेन की गृहखातं माझ्याकडे द्या, मी चालवून दाखवते, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं. आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सीडीआर वगैरे तपासणं ही गृहखात्याची जबाबदारी आहे. बाकी सगळंच जर मी करायचं असेल, तर मी पुन्हा म्हणेन की गृहखातं माझ्याकडे द्या, मी चालवून दाखवते, असं आव्हान सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. 

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, संजय राठोड कॅबिनेटमंत्री असताना जेव्हा आरोप झाले, तेव्हा संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला. तसेच अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची केवळ ऐकीव माहिती आणि परमबीर सिंह यांनी केलेले आरोप, जे आरोप सिद्धही झालेले नव्हते, तरीही त्यांना कोठडीत टाकलं गेलं. पण आम्ही आता आहेराची यादीच वाचली, पण आता काय कारवाई झाली? आम्ही आरोप करून ४८ तास झाले. या ४८ तासांमध्ये शंभुराज देसाई यांचं कुठलं अधिकृत वक्तव्य आलंय. का ते या आरोपांवर अधिकृत वक्तव्य करत नाहीत. भाजपाला भ्रष्टाचार आणि वसुलीची चिड आहे ना, मग यावर गृहमंत्र्यांचं अधिकृत वक्तव्य का येत नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

अपघात तसे अनेक होतात. मात्र या एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराने पोखरून काढलेली सगळी व्यवस्था चव्हाट्यावर आलेली आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य करावं लागेल, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSushma Andhareसुषमा अंधारेPuneपुणेAccidentअपघात