पुण्यात पुन्हा जळीतकांड, कोथरूडमध्ये ८ वाहनं जाळली

By Admin | Updated: April 6, 2016 09:58 IST2016-04-06T09:55:53+5:302016-04-06T09:58:31+5:30

पुण्यातील वाहन जळीतकांडाचे सत्र अद्याप सुरूच असून कोथरूड परिसरात ८ वाहने जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे

In Pune, 8 vehicles were burnt in Kothrud | पुण्यात पुन्हा जळीतकांड, कोथरूडमध्ये ८ वाहनं जाळली

पुण्यात पुन्हा जळीतकांड, कोथरूडमध्ये ८ वाहनं जाळली

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ६ - पुण्यातील वाहन जळीतकांडाचे सत्र अद्याप सुरूच असून कोथरूड परिसरात ८ वाहने जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळीतकांडाची महिन्याभरातील ही चौथी घटना आहे. 
पुण्यातील कोथरूड भागातील किष्किंदा नगरमध्ये मंगळवारी रात्री आठ दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. किष्किंदा नगरमधील रहिवासी त्यांच्या दुचाकी एका मोकळ्या मैदानात पार्क करून ठेवतात. मात्र या दुचाकींना काल मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास आग लागली आणि वाहने जळून खाक झाली. हा परिसर पूर्णपणे मोकळा असल्याने ही आग अन्य कोणत्याही कारणामुळे लागली नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. 
गेल्याच महिन्यात पुण्यातील कात्रज परिसरातील गणेश पार्क सोसायटीत तीन मोटारी व १५ दुचाकी अशा १८ गाड्या आगीत जळून खाक झाल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी प्रणय धावटे याला अटकही केली होती. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असलेल्या प्रणयने, स्वतःच्या गाडीला रंग लावला म्हणून रागातून सोसायटीतील इतर वाहनांना आग लावल्याचे तपासात दिसून आले. 

Web Title: In Pune, 8 vehicles were burnt in Kothrud