शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Pulwama Attack: राज्यभरात तीव्र संताप, निषेध अन् श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 01:15 IST

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी हल्ल्याचा निषेध करत श्रद्धांजली सभा घेतल्या.

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी हल्ल्याचा निषेध करत श्रद्धांजली सभा घेतल्या.सोशल मीडियावरूनही पुलवामा हल्ल्याचा निषेध पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. नेटीझन्सनी फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करणारे संदेश आणि छायाचित्रे शेअर केली.बऱ्याच नेटीझन्सनी काळ्या रंगाचे प्रोफाईल फोटो अपलोड करून निषेध व्यक्त केला. तर काहींनी ‘पाकिस्तानचा बदला घ्या; आता युद्ध करा’ अशा आशयाच्या पोस्ट शेअर केल्यात. फेसबुकवर बºयाच नेटीझन्सनी सत्ताधाºयांच्या विरोधातील संदेश पोस्ट केले. ‘आता तरी प्रचार थांबवा’, ‘शासकीय कार्यक्रम रद्द करा’, ‘या हल्ल्याचा प्रचाराकरिता वापर करू नका’ अशा आशयाच्या पोस्ट काहींनी शेअर केल्या. टिष्ट्वटरवरही #पुलवामाअटॅक हा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये होता.तमाशा महोत्सव स्थगितपुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ‘राज्य ढोलकी-फड-तमाशा-महोत्सव’ स्थगित करण्यात आला आहे. शिवाय तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळाही स्थगित करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली.राज्य ढोलकी-फड-तमाशा महोत्सव पुण्यातील वाघोली येथे १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला होता. मात्र, पुलवामा येथे आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. उपरोल्लेखीत दोन्ही कार्यक्रमांची पुढील तारीख नंतर घोषित केली जाणार आहे.पाकची गाणी बंद करा; मनसेचा इशाराअद्यापही काही भारतीय म्युझिक कंपन्या पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करत आहे. पाकिस्तानी कलाकारांची गाणी असलेले अल्बम बनविण्याचे काम सुरू आहे. पाकिस्तानात गाणी रेकॉर्ड करून भारतात पाठविले जातात आहेत. संबंधित कंपन्यांनी ही कामे ताबडतोब बंद करावीत, अन्यथा त्यांचा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल, असा इशारा मनसे सिने विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले.रक्ताने लिहिली ५० पत्रेपुण्यातील काँग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्रे लिहिली आहेत. या हल्ल्याला भाजपा सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे पत्र कुरिअर आणि ई-मेलद्वारे मोदींना पाठविण्यात येणार आहे.अमरावतीत शोकसभाअमरावतीत शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी पुष्पच्रक वाहून श्रद्धांजली वाहिली. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी शोक व्यक्त केला.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMaharashtraमहाराष्ट्र