नाम फाउंडेशनला पुलोत्सव सामाजिक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 00:51 IST2016-11-05T00:51:44+5:302016-11-05T00:51:44+5:30

सामाजिक कायार्साठी नाम फाउंडेशनला ‘’पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

Pulotsav Social Award for Name Foundation | नाम फाउंडेशनला पुलोत्सव सामाजिक पुरस्कार

नाम फाउंडेशनला पुलोत्सव सामाजिक पुरस्कार


पुणे : सामाजिक कायार्साठी नाम फाउंडेशनला ‘’पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे व गायक महेश काळे यांना ‘पुलोत्सव तरुणाई पुरस्कार’ देण्यात येणार आहे. तर, दिवंगत अभिनेत्री व नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांना य ावर्षी पुलोत्सव विशेष सन्मान (मरणोत्तर) प्रदान करण्यात येईल. दि १० ते १३ नोव्हेंबर रंगणाऱ्या ‘पुलोत्सवा’मध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.
पुलोत्सवाचे उद्घाटन दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, २१ हजार रुपये, शाल व श्रीफल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. याशिवाय, नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे संचालित नाम फाउंडेशनला या वर्षीचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि २५ हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pulotsav Social Award for Name Foundation