पुजीत अगरवालला न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: September 21, 2016 05:46 IST2016-09-21T05:46:43+5:302016-09-21T05:46:43+5:30
आॅरबिट कॉर्पोरेशनचा कार्यकारी संचालक पुजीत अगरवाल याची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

पुजीत अगरवालला न्यायालयीन कोठडी
मुंबई : गुंतवणूकदारांच्या सुमारे ५२ कोटींच्या अपहार प्रकरणातील मुख्य संशयित आॅरबिट कॉर्पोरेशनचा कार्यकारी संचालक पुजीत अगरवाल याची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने त्याला अटक केली होती. त्याला ३ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
‘आॅरबिट’मधील ५२ कोटींच्या अपहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून सुरू होता. सोमवारी कार्यकारी संचालक अगरवाल याच्या कार्यालयावर छापा टाकून ७७ लाखांची रोकड, चार लॅपटॉप व दोन हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या. (प्रतिनिधी)