खटावच्या श्वान स्पर्धेत पुसेगावच्या रेंजरची बाजी!

By Admin | Updated: April 23, 2017 20:39 IST2017-04-23T20:39:33+5:302017-04-23T20:39:33+5:30

भैरवनाथ यात्रेनिमित्त प्रथमच भरवण्यात आलेल्या श्वान स्पर्धेत पुसेगावच्या रेंजरने प्रथम क्रमांक पटकविला.

Puegna Rangers betting in the squash competition of Khata! | खटावच्या श्वान स्पर्धेत पुसेगावच्या रेंजरची बाजी!

खटावच्या श्वान स्पर्धेत पुसेगावच्या रेंजरची बाजी!

ऑनलाइन लोकमत
खटाव, दि. 23 - येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त प्रथमच भरवण्यात आलेल्या श्वान स्पर्धेत पुसेगावच्या रेंजरने प्रथम क्रमांक पटकविला. अभूतपूर्व उत्साहात झालेल्या या श्वान शर्यतीमध्ये पन्नासहून अधिक विविध जातीच्या श्वानांचा सहभाग होता.
यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांतील श्वान स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

एकूण पन्नासहून अधिक श्वान या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या पुसेगावच्या संदीप जाधव यांच्या रेंजरने प्रथम क्रमांक पटकविला तर दुसरा क्रमांक राहुल मंडले व दिनकर मंडले देवीखिंंडी, ता. खानापूर यांच्या शन्नोने पटकविला. तृतीय क्रमांक निळेश्वर प्रसन्न वडोली यांच्या वझीरने पटकविला. चौथ्या क्रमांकावर अमर पाटील पुसेसावळी यांच्या फनी बाँड बिगब्रदर ग्रुप, कलेढाणच्या क्रांतीने पटकविला.

उत्कृष्ट समालोचनाद्वारे उपस्थितामध्ये उत्सुकता निर्माण करण्याचे काम प्रकाश बापू महागावकर यांनी केले. परीक्षक म्हणून विकास जाधव, आबा जाधव, सौरभ देशमुख, राजू बोर्गे, युवराज पाटोळे, अजय पाटोळे यांनी काम पाहिले. 

Web Title: Puegna Rangers betting in the squash competition of Khata!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.