शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्यातील ‘पीयुसी’च्या दरात दोन ते तीन पटीने वाढ होणार : 'ऑल पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशन'चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 18:37 IST

राज्य शासनाने मागील दहा वर्षांपासून ‘पीयुसी’चे दर वाढविले नाहीत...

ठळक मुद्देपीयुसी मालक संघटना : दराविरोधात कारवाई केल्यास बंद

पुणे : राज्य शासनाने मागील दहा वर्षांपासून ‘पीयुसी’चे दर वाढविले नाहीत. ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे चालकांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत असून पीयुसी केंद्र चालविणेही कठीण होत असल्याचा दावा करत ऑल पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनने पीयुसीचे दर दोन ते तीन पटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागु केली जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.मागील वर्षी एप्रिल महिन्यात पीयुसीसाठी ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू  करण्यात आली. त्यानंतर मागील कोरोनामुळे २२ मार्चपासून पीयुसी सेंटर बंद होते. त्याचा फटका चालकांना बसला आहे. अनेकांनी कर्ज काढून नवीन पीयुसी मशीन घेतले आहे. ऑनलाईनमुळे इंटरनेटचा खर्च वाढला आहे. पण शासनाने दरवाढ न केल्याने २०११ च्या दराप्रमाणेच पीयुसीचे वितरण केले जात आहे. सध्या बहुतेक वाहने बीएस ४ असल्याने त्यांना १ वर्षाचे पीयुसी देणे बंधनकारक आहे. यापुर्वी किमान सहा महिन्यांचे पीयुसी देण्यात येत होते. त्यामुळे आता वाहनधारक पुन्हा वर्षानेच येणार आहेत. ऑनलाईनमुळे वेळही अधिक लागत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप भंडारे यांनी सांगितले.खर्च वाढलेला असल्याने संघटनेकडून दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनालाही कळविण्यात आले आहे. त्यांनी हे दर मान्य करणे अपेक्षित आहे. मोटार वाहन कायद्यानुसार पीयुसीचे दर ठरविण्याचे अधिकार राज्य शासनाला नाहीत. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून संघटनेकडूनच दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचा खर्चानुसार हे दर निश्चित करण्यात आले आहेत. याविरोधात शासनाने कारवाई केल्यास आम्ही राज्यातील सर्व पीयुसी केंद्र बंद ठेवू, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.------------------पीयुसीचे सध्याचे दर व वाढणारे दरवाहन प्रकार        सध्याचे दर      वाढणारे दरदुचाकी                  ३५                १००तीनचाकी               ७०                १५०चारचाकी (पेट्रोल)    ९०                २००चारचाकी (डिझेल)   ११०              ३००सर्व अवजड वाहने   ११०               ४००

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या