साहित्य संमेलनाच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन

By Admin | Updated: January 9, 2016 01:28 IST2016-01-09T01:28:19+5:302016-01-09T01:28:19+5:30

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे टपाल तिकीट प्रकाशित झाले असून, त्याचे अनावरण अभिनेते स्वप्निल जोशी यांच्या हस्ते झाले.

Publication of the postal stamp of literature meeting | साहित्य संमेलनाच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन

साहित्य संमेलनाच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे टपाल तिकीट प्रकाशित झाले असून, त्याचे अनावरण अभिनेते स्वप्निल जोशी यांच्या हस्ते झाले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात झालेल्या या सोहळ्यात संमेनलाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, आणि समन्वयक सचिन इटकर उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनासाठी जास्तीत जास्त प्रमाणात होत असणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर आणि आता पोस्टाच्या तिकिट यामुळे संमेलन व त्याच्या रम्य आठवणी दीर्घकाळ रसिकांच्या स्मरणात राहील, असा विश्वास स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केला. साहित्य संमेलन म्हणजे केवळ साहित्याचा गौरव नसून त्यात सामाजिक भानही आयोजकांनी जपले आहे. संमेलनात जमा होणारा निधी विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विकासासाठी देण्यात येणार असल्याबद्दल डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले.(प्रतिनिधी)

Web Title: Publication of the postal stamp of literature meeting