‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: February 20, 2015 01:18 IST2015-02-20T01:18:50+5:302015-02-20T01:18:50+5:30
‘लोकप्रज्ञा’ या पुरस्कार विजेत्यांची नावे बुधवारी एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी घोषित केली. २०१३-१४ वर्षासाठीच्या या पुरस्कारप्राप्त पाल्यांना प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविले जाईल.

‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार जाहीर
औरंगाबाद : ‘लोकमत’ परिवारातील पाल्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी व त्यांना पुढील शैक्षणिक जीवनात प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित ‘लोकप्रज्ञा’ या पुरस्कार विजेत्यांची नावे बुधवारी एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी घोषित केली. २०१३-१४ वर्षासाठीच्या या पुरस्कारप्राप्त पाल्यांना प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविले जाईल.
‘लोकमत’ परिवाराशी निगडित (सहयोगी) असणाऱ्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याअंतर्गत या वर्षीपासून ही पुरस्कार योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होऊ शकतो. या वेळी राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते लोकप्रज्ञा पुरस्कार योजनेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘लोकमत भवन’मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सर्व विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ सहकारी उपस्थित होते.
कोणत्या आवृत्तीला किती पुरस्कार?
च्औरंगाबाद आवृत्तीतील ११ शालेय मुलांना पुरस्कार आणि ४ मुलांना उत्तेजनार्थ विशेष प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आले. अहमदनगर आवृत्तीतील पाच शालेय मुलांना पुरस्कार, सोलापूरमधील सहा शालेय मुलांना पुरस्कार आणि चार मुलांना प्रशस्तिपत्र तर महाविद्यालयीन गटात दोघांना पुरस्कार जाहीर करण्यात आला.
च्कोल्हापूरमधील आठ शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, सात मुलांना
प्रशस्तिपत्र आणि एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पुरस्कार, नागपूरमधील ११ शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, तिघांना प्रशस्तिपत्र आणि दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुरस्कार, जळगावमधून सात शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि तिघांना प्रशस्तिपत्र, मुंबईतून चार शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, नाशिकमधून १४ शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि सहा जणांना प्रशस्तिपत्र, पुणे आवृत्तीतून १० शालेय विद्यार्थ्यांना आणि एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पुरस्कार, अकोल्यातून ११ शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, आठ जणांना प्रशस्तिपत्र, मुंबई मेट्रोमधून पाच शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, दिल्ली मेट्रोमधून तीन शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि दोघांना प्रशस्तिपत्र, नांदेडमधून तीन शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, गोव्यातून एका शालेय विद्यार्थ्याला पुरस्कार व एकाला प्रशस्तिपत्र आणि लातूरमधून सात शालेय विद्यार्थ्यांना, असे एकूण १५० पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण त्या-त्या आवृत्तीत लवकरच केले जाईल.