सार्वजनिक ठिकाणी आलिंगन देणे पडले महागात

By Admin | Updated: September 17, 2014 14:59 IST2014-09-17T13:50:27+5:302014-09-17T14:59:25+5:30

मॉलबाहेरच्या बेंचवर गप्पा मारताना अलिंगन देणे एका प्रेमी युगुलाला भलतेच महागात पडले असून अश्लील चाळे केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी युगूलाला दंड ठोठावला आहे

In the public place embraces the costly | सार्वजनिक ठिकाणी आलिंगन देणे पडले महागात

सार्वजनिक ठिकाणी आलिंगन देणे पडले महागात

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ -  मॉलबाहेरच्या बेंचवर गप्पा मारताना आलिंगन देणे एका प्रेमी युगुलाला भलतेच महागात पडले असून अश्लील चाळे केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी युगूलाला १२०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र दंडाची पावती देताना त्यावर कोणतेही कारण देण्यात आले नाही असे या प्रकरणतील तरुणाचे म्हणणे आहे. 
भाईंदरमध्ये राहणारा २४ वर्षीय तरूण शनिवारी त्याच्या मैत्रिणीसोबत ओबेरॉय मॉलमध्ये चित्रपट पाहण्यास गेला होता. ' चित्रपट पाहून तो व त्याची मैत्रिण मॉलबाहेर हायवेलगतच्या बाकड्यांवर गप्पा मारत बसले असता  अचानक साध्या कपड्यांतील दोन महिला व दोन पुरूष तेथे आले व त्यांनी त्या युगुलाला त्यांच्यासोबत चलण्यास सांगितले. त्या दोघांनी त्यांना प्रश्न विचारले असता, आपण पोलिस असून तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये यावे लागेल, असे सांगितले. मात्र कोणतेही ओळखपत्र दाखवले नाही.
ते सर्व जण एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते असल्याचे वाटून तरूणीने  ओरडायला सुरूवात केली. त्यावेळी एका पुरूषाने या प्रकाराचे रेकॉर्डिंग करण्यास सुरूवात केली.  तेवढ्यात तेथे गणवेशातील एक पोलिस आला व त्यानंतरच ते चौघेही पोलिस असल्याचे समजले. त्या तरूणाने त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले, मात्र एका महिला पोलिसने काही क्षणांसाठी ते बाहेर काढून दाखवले आणि पटकन पाकिटात ठेवले. त्यामुळे तिचे नावही कळू शकले नाही. 
पोलिस दोघांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी दंड म्हणून १२१० रुपये भरण्यास सांगितले. मात्र दंडाची पावती देताना, त्यावर कोणतेही कारण लिहीलेले नव्हते, असे त्या तरूणाचे म्हणणे आहे. 

Web Title: In the public place embraces the costly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.