धनगर आरक्षणासंदर्भात जनहित याचिका
By Admin | Updated: August 28, 2016 21:38 IST2016-08-28T21:38:46+5:302016-08-28T21:38:46+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करत नसल्याने राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली

धनगर आरक्षणासंदर्भात जनहित याचिका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - धनगर आरक्षणाचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करत नसल्याने राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याआधी बेमुदत उपोषण आणि मंत्रालयावर धडक मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिल्याचा दावा समितीचे प्रमुख हेमंत पाटील यांनी केला आहे.
पाटील म्हणाले की, समितीने केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनपूर्तीसाठी ते कोणतेही पाऊल उचलत नाही आहेत. त्यामुळे समितीने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, सर्व धनगर बांधवांना एसटी प्रवर्गाचे दाखले मिळावेत, म्हणून शासन दरबारी अर्ज
करण्याचे आवाहन समितीने केले आहे. शिवाय या अर्जाची प्रत समिताला पाठवण्यास सांगितले आहे. या जोरावर उच्च न्यायालयात बाजू मांडणार असून या आगळ््यावेगळ््या आंदोलनामुळे सरकारची झोप उडाली असल्याचे पाटील यांनी
सांगितले.