शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

इंटरसिटी ट्रेनसाठी उच्च न्यायालयात धाव; ‘रेल परिषद एनएक्स’ची जनहित याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 09:58 IST

मुंबई-नाशिक, पुणे-मुंबई प्रवास, मुंबई-नाशिक व पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेनला मध्य रेल्वेने अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही.

मुंबई : मुंबई-नाशिक, पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेन सुरू कराव्यात व त्या ट्रेनच्या प्रवाशांना मासिक, तिमाही, सहामाही पास द्यावे, याकरिता रेल परिषद एनएक्स या मुंबई-नाशिक ट्रेन प्रवाशांच्या संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

कोरोनामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असून आता शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, मॉल्स इत्यादींचा कारभार पूर्ववत सुरू झाला आहे. तसेच कोरोनावरील दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभाही देण्यात आली आहे. सर्व सरकारी, निमसरकारी व खासगी कार्यालये सुरू झाल्याने नाशिक व पुणे येथून मुंबईत कामाला येणाऱ्या चाकरमान्याची मोठी पंचाइत झाली आहे. कारण मुंबई-नाशिक व पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेनला मध्य रेल्वेने अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही. पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व इंटरसिटी ट्रेन सुरू झाल्या असल्या तरी मध्य रेल्वेने मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेन सुरू केल्या नाहीत. मध्य रेल्वेच्या या निर्णयाविरोधात रेल परिषद एनएक्स या संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

नाशिक व मुंबई या दोन्ही शहरांत अनलॉक करण्यात आल्याने मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची सेवा सुरळीत करण्यात यावी. तसेच मुंबई- नाशिक, पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्व इंटरसिटी ट्रेन्स सुरू कराव्यात. त्याशिवाय या ट्रेन्सला महिलांसाठी व पास असलेल्या प्रवाशांसाठी असलेले विशेष डबे जोडण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर लवरकच सुनावणी होणार आहे.

प्रवाशांच्या मूलभूत अधिकारावर गदानाशिक व पुण्यातून हजारो प्रवासी उदरनिर्वाहासाठी मुंबईत येतात. मुंबईत राहणे आर्थिकरित्या परवडणारे नसल्याने या दोन्ही शहरांतील लोक कामावर येण्यासाठी ट्रेनचा पर्याय निवडतात. लॉकडाऊन दरम्यान या मार्गांवरील इंटरसिटी ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. आता सर्व कार्यालये, संस्था, आस्थापने सुरू झाल्याने लोकांना कामावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र मध्य रेल्वेने मुंबई-नाशिक व पुणे-मुंबई दरम्यानच्या इंटरसिटी बंद ठेवून प्रवाशांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे