मुंबई : माजी मंत्री नारायण राणे, छगन भुजबळ व राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कवडीमोल भावात भूखंड घेऊन शिक्षण संस्था उघडल्याचा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असून याची दखल घेत न्यायालयाने या माजी मंत्र्यांना प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत़पुण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही जनहित याचिका केली आहे़ या मंत्र्यांनी सरकारचे भूखंड अत्यल्प दरात लाटल्याचा कॅगचा अहवाल आहे़ त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकेत केली आहे़ न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात या याचिकेतील प्रतिवादी माजी मंत्री पंतगराव कदम यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून हे आरोप फेटाळून लावले़ (प्रतिनिधी)
राणे, भुजबळ, विखे-पाटीलांविरुद्ध जनहित याचिका
By admin | Updated: January 13, 2015 04:59 IST