शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

25 हजार मुलींच्या उपस्थितीत 'माझी कन्या भाग्यश्री'साठी जनजागृती कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 21:33 IST

पुणे : मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या बुधवारी ( 3 जानेवारी) पुणे येथे २५ हजार मुलींच्या उपस्थितीत भव्य अशा जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या बुधवारी ( 3 जानेवारी) पुणे येथे 25 हजार मुलींच्या उपस्थितीत भव्य अशा जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव (जि. सातारा) या जन्मगावापासून या योजनेचा जाणीव जागृती अभियान चित्ररथ निघणार असून 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे त्याचा समारोप होणार आहे. मुलींचा जन्म आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या काळात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.बालेवाडी, पुणे येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे बुधवार 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पुणे आणि परिसरातील 25 हजार मुली सहभागी होणार आहेत. राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या मुलींना या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे. याशिवाय याच दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (जि. सातारा) येथून जाणिव जागृती अभियान चित्ररथ निघणार आहे. हा चित्ररथ 5 जानेवारी रोजी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या वणंदगाव (जि. रत्नागिरी) येथे तर 8 जानेवारी रोजी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (जि. अहमदनगर) येथे जाईल. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे या रथाचा समारोप होईल. या रथाच्या माध्यमातून मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवाचा प्रभावी जनजागर केला जाणार आहे. याशिवाय यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री आणि केंद्र शासनाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेविषयी या मोहिमेत माहिती दिली जाणार आहे, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.        बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री विद्या ठाकूर, दिलीप कांबळे, विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, नितीन काळजे, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, आमदार संग्राम थोपटे, मेधा कुलकर्णी, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, महिला झ्र बालविकास सचिव विनिता वेद झ्र सिंगल, आयुक्त लहूराज माळी, आयसीडीएस आयुक्त कमलाकर फंड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPuneपुणेWomenमहिला