सरसंघचालक मोहन भागवतांना 'झेड प्लस' सुरक्षा प्रदान

By Admin | Updated: June 7, 2015 18:58 IST2015-06-07T18:58:32+5:302015-06-07T18:58:34+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना 'झेड प्लस' सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Provide 'Z Plus' security to Sarasanghchalak Mohan Bhagwat | सरसंघचालक मोहन भागवतांना 'झेड प्लस' सुरक्षा प्रदान

सरसंघचालक मोहन भागवतांना 'झेड प्लस' सुरक्षा प्रदान

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ७ -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना 'झेड प्लस' सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राष्ट्रपती व पंतप्रधानांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था मिळणारे मोहन भागवत हे पहिलेच व्यक्ती ठरणार आहेत. 
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भगवत यांना ही सुरक्षा देण्यात आल्याने आता सीआयएसएफचे कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात तसेच महाराष्ट्र अथवा देशभरातील कोणत्याही दौ-यादरम्यान भागवत यांच्यासमवेत हे कमांडो असतील. तसेच भागवत यांच्या वाहनांच्या ताफ्यातही बदल करण्यात येईल. सुरक्षिततेचा भाग म्हणून सरसंघचालक भागवत यांच्या अवतीभोवती २४ तास कमांडोंचा जागता पहारा असणार आहे. 

Web Title: Provide 'Z Plus' security to Sarasanghchalak Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.