शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

पुढील ८ दिवसांत माझ्यावरील आरोप सिद्ध करा; सुनील शेळकेंचं शरद पवारांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 14:53 IST

मेळाव्यात मिळणारा कमी प्रतिसाद पाहून आयोजकांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली असा आरोप शेळकेंनी केला.

मावळ - Sunil Shelake on Sharad Pawar ( Marathi News ) माझ्याबाबतीत शरद पवारांनी असं विधान का केले हे मी त्यांना भेटून विचारणार आहे. जर माझे काही चुकले तर मी जाहीर माफी मागेन. पुढच्या ८ दिवसांत ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांनी साहेबांना सांगावे, नाहीतर मी राज्यभरात सांगणार साहेबांनी माझ्याबाबतीत मतदारसंघात येऊन चुकीचे वक्तव्य केले हे सांगेन असं आव्हान आमदार सुनील शेळकेंनी शरद पवारांना दिले आहे. 

आमदार सुनील शेळके म्हणाले की, शरद पवारांनी आजपर्यंत कधी कुणावरही असं विधान करताना मी पाहिले नाही. व्यक्तिगतही टिप्पणी केल्याचे पाहिलं नाही. परंतु माझ्याबाबतीत असं का बोलले हे भेटून विचारणार. कुणी माहिती दिली, माझे काय चुकले हे मी नक्कीच विचारणार आहे. पुढच्या काळात मलाही सांभाळून काम करावे लागेल. सत्ता, पद, प्रतिष्ठा ही क्षणिक आहे. ज्या मावळच्या मायबाप जनतेने माझ्यावर प्रेम केले ते आजही माझ्यासोबत आहेत. राजकारणात भविष्यात काय होईल याची मी पर्वा करत नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार इथं आले होते. ज्यांनी हा मेळावा आयोजित केला त्यांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली. शेकडो कार्यकर्ते अजित पवारांची साथ सोडून आपल्याकडे यायला तयार आहेत. आपण आलात तर पक्षप्रवेश करून त्यांना सन्मानित करायचे आहे. शेकडो कार्यकर्ते सांगितले आणि केवळ ३५-४० कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. ठाकरे-काँग्रेसचे कार्यकर्ते मेळाव्याला होते. संपूर्ण कार्यक्रमाचा फज्जा उडतोय हे पाहून आयोजकांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली. सुनील शेळकेंनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशाप्रकारे धमकी दिली असं सांगितल्यानंतर शरद पवारांनी हे विधान केले असंही शेळकेंनी सांगितले. 

दरम्यान, मागील ६ महिन्यापूर्वीच्या घडामोडीचा मीदेखील साक्षीदार आहे. भाजपात जाण्यासाठी कोण कोण आग्रही होते. त्यातून अजितदादांना ऐनवेळी तोंडघशी पाडणे हे पाहिले आहे. त्यामुळे अजितदादांना टार्गेट करून रोहित पवार, जितेंद्र आव्हाड हे नेते होऊ शकत नाही. शेवटी दादाच्या कामाचा आवाका, ३०-३५ वर्षाचे योगदान माहिती आहे. स्वत:च्या स्वार्थासाठीच राजकारण करायचे असेल तर आम्हालाही जाहीरपणे बोलले पाहिजे असा इशारा सुनील शेळकेंनी दिला आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस