कोल्हापुरातही पत्रकार मारहाणीचा निषेध

By Admin | Updated: November 5, 2016 15:45 IST2016-11-05T15:45:03+5:302016-11-05T15:45:03+5:30

मुंबईतील टाटा कंपनीच्या मुख्यालयाबाहेर सुरक्षा रक्षकांकडून पत्रकार आणि छायाचित्रकारांना झालेल्या मारहाणीच्या कोल्हापुरातही निषेध व्यक्त करण्यात आला.

Protest of journalist marriages in Kolhapur | कोल्हापुरातही पत्रकार मारहाणीचा निषेध

कोल्हापुरातही पत्रकार मारहाणीचा निषेध

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 5 -  मुंबईतील टाटा कंपनीच्या मुख्यालयाबाहेर सुरक्षा रक्षकांकडून पत्रकार आणि छायाचित्रकारांना झालेल्या मारहाणीच्या कोल्हापुरातही निषेध व्यक्त करण्यात आला.  कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे छत्रपती शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. 
 
यावेळी सायरस मिस्त्री यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी काळ्या फिती लावून पत्रकारांनी झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला.
 
(VIDEO - टाटा हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून छायाचित्रकारांना मारहाण)
 
तसेच, बेळगावातील मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या मारहाणीचीही निषेध करण्यात आला. 
यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील आणि अन्य सदस्यांनी निषेध रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. 
 
ठाण्यामध्येही पत्रकारांनी निषेध व्यक्त करत 'टाटा सन्स'विरोधात जोरदार निदर्शने केली.  ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना झालेल्या मारहाणीविरोधात निदर्शनं करण्यात आली होती.
 

Web Title: Protest of journalist marriages in Kolhapur