राज ठाकरेंविरोधात बोगदा चाळ रहिवाशांची निदर्शने
By Admin | Updated: May 9, 2015 01:45 IST2015-05-09T01:45:30+5:302015-05-09T01:45:30+5:30
परळच्या बोगदा चाळीतील रहिवाशांनी शुक्रवारी आझाद मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निदर्शने केली. पुनर्विकासाच्या प्रश्नावर

राज ठाकरेंविरोधात बोगदा चाळ रहिवाशांची निदर्शने
> परळच्या बोगदा चाळीतील रहिवाशांनी शुक्रवारी आझाद मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निदर्शने केली. पुनर्विकासाच्या प्रश्नावर
३० एप्रिलपासून शेकडो रहिवासी आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. मात्र रहिवाशांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करीत राज ठाकरे न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सलमान खानच्या भेटीला गेल्याचा रहिवाशांचा मनात रोष होता. वाघिणी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती बडेकर म्हणाल्या की, १ मे रोजी रहिवाशांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन संघटना राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेली होती.
> मात्र वेळेचे कारण देत ठाकरे यांनी भेट नाकारली. निवेदन देऊन ८ दिवस उलटले आहेत. मात्र राज ठाकरे किंवा त्यांचा कोणताही प्रतिनिधी अद्याप रहिवाशांची साधी विचारपूस करण्यासही आलेले नाही. याउलट न्यायालयाने ५ वर्षांचा कारावास सुनावलेल्या सलमान खानला भेटण्यासाठी ठाकरे यांच्याकडे वेळ होता. गेल्या १० दिवसांपासून शेकडो मराठी रहिवाशी कुटुंबासह या ठिकाणी आंदोलन करीत आहेत. मात्र त्यांच्याहून ठाकरे यांना एक गुन्हेगार जवळचा वाटला. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी आज ठाकरेंविरोधात निदर्शने केली.