विठ्ठल भक्तांना विम्याचे संरक्षण
By Admin | Updated: July 10, 2016 02:38 IST2016-07-10T02:38:56+5:302016-07-10T02:38:56+5:30
महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांना विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नुकताच घेण्यात आला आहे़

विठ्ठल भक्तांना विम्याचे संरक्षण
पंढरपूर : महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांना विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नुकताच घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे आता मंदिर परिसरात काही दुर्घटना घडली तर आपद्ग्रस्त भाविकास २५ हजारांपासून दोन लाखांपर्र्यंंतची मदत देता येणे शक्य होणार असल्याचे मंदिर समितीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक पंढरीत येतात. त्यांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासन नेहमीच तत्पर असते. मात्र तरीही काही दुर्घटना घडली, तर या काळजीपोटी हा विमा उतरविण्याचा निर्णय मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी घेतला होता. त्यानुसार मंदिर समितीने विविध विमा कंपन्यांशी बोलणी केली. (प्रतिनिधी)