दुष्काळी मदतीच्या प्रस्तावाला मान्यता!
By Admin | Updated: May 29, 2016 00:32 IST2016-05-29T00:32:40+5:302016-05-29T00:32:40+5:30
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली असून, शेतकऱ्यांना दुष्काळी मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र
दुष्काळी मदतीच्या प्रस्तावाला मान्यता!
- मुख्यमंत्र्यांची घोषणा
अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली असून, शेतकऱ्यांना दुष्काळी मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी शनिवारी अकोल्यात केली.
केंद्र सरकारचे राज्य शासनाला खूप मोठे सहकार्य मिळाले असून, गत दहा वर्षांपासून राज्यात रखडलेल्या रेल्वे विकास कामांना आणि रस्ते कामांना गती आली आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय कौशल्य विकास तथा संसदीय कामकाज मंत्री राजीव प्रताप रुडी, केंद्रीय खणन व पोलाद मंत्री विष्णुदेव साय, महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)