शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकऱ्यांचा संप : साताऱ्यात दुधाची गाडी फोडली

By admin | Updated: June 1, 2017 02:16 IST

आज मध्यरात्रीपासून शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली असून, शहरांकडे जाणारा भाजीपाला आणि दुधपुरवठा रोखण्यासाठी आंदोलकांनी कंबर

ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 1 -  आज मध्यरात्रीपासून शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली असून, शहरांकडे जाणारा भाजीपाला आणि दुधपुरवठा रोखण्यासाठी आंदोलकांनी कंबर कसली आहे. या संपादरम्यान साताऱ्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुधाच्या गाड्या रोखल्या असून, दूधवाहतूक करणाऱ्या ट्रकची तोडफोड केली आहे. आज मध्यरात्री पुणे-बंगळुरू महामार्गावर ही तोडफोड करण्यात आली आहे.   दरम्यान, शहराकडे येणारा भाजीपाला आणि दुधपुरवठा रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ठिकठिकाणी रात्री 10 पासूनच शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नगर-कल्याण हायवेवर टाकळी ढोकेश्वर,ता.पारनेर जि.अहमदनगर येथे शेतकऱ्यांनी चेकपोस्ट उभारले आहेत. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करून शेतमालाची वाहने रोखून धरली जात आहेत. नगर जिल्ह्यातील ३५०० दूध संकलन केंद्रे, ५०० शीतकरण केंद्रे व प्रकल्प संपादरम्यान बंद राहणार आहेत. संपकाळात मुंबईला जाणारे १०लाख लिटर दूध रोखण्यात येईल. तसेच सर्व बाजार समित्या बंद राहणार. संप यशस्वी करण्यासाठी राज्यात गनिमी कावा पथके कार्यरत झाली आहेत. दरम्यान  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी वाहतूकदारांना इशारा दिला आहे. मुंबईला जाणारे गोकुळचे १२लाख दूध अडवणार असल्याचे ते म्हणाले. 
शेतकऱ्यांची कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकऱ्यांचा संप पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी भेट देऊन आंदोलनाच्या नेत्यांना चर्चेसाठी मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार सायंकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसमवेत शिष्टमंडळाची बैठक झाली. सातबारा कोरा करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावे, हा मुद्दा शिष्टमंडळाने बैठकीत प्रारंभीच मांडला. या मुद्यावर निर्णय झाल्याशिवाय पुढे चर्चाच होणार नाही, अशी शिष्टमंडळाची अट होती. परंतु सरसकट कर्जमाफी शक्य नसून, थकबाकीदार शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देऊ, या आपल्या पूर्वीच्या घोषणेवर मुख्यमंत्री ठाम राहिले. 
 
शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत आहे, असेही त्यांनी सांगितले. या उत्तरावर शिष्टमंडळाचे समाधान न झाल्याने शिष्टमंडळ बैठकीतून बाहेर पडले. वेतन आयोग व उद्योगांसाठी पैसे आहेत. मग, शेतकरी कर्जमाफीसाठी का नाही? असा प्रश्न उपस्थित करत शिष्टमंडळाने संपाचा निर्णय कायम ठेवला.
 
१ जूनपासून दूध, भाजीपाला बंद 
सरकारसोबतची चर्चा फिस्कटल्याने शेतकरी नेत्यांनी गुरुवारपासून महामार्गावर चौक्या उभारून दूध व भाजीपाल्याची वाहने अडविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी दूध व भाजीपाला बाजारात आणू नये, अशी वाहने आढळल्यास ती अडवली जातील, असे समन्वय समितीने जाहीर केले आहे.