शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दोन कार्यकारी संचालकांची पदोन्नती रद्द, सहा दिवसांत मूळ पदावर

By यदू जोशी | Updated: November 8, 2017 05:24 IST

बढतीतील आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आता दोन सिंचन महामंडळांमध्ये दोन अधिका-यांना कार्यकारी संचालक म्हणून दिलेली पदोन्नती रद्द करण्याची वेळ आज जलसंपदा विभागावर आली.

मुंबई : बढतीतील आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आता दोन सिंचन महामंडळांमध्ये दोन अधिका-यांना कार्यकारी संचालक म्हणून दिलेली पदोन्नती रद्द करण्याची वेळ आज जलसंपदा विभागावर आली.मुख्य अभियंता रसिक मदनलाल चौहान यांना कोकण सिंचन विकास महामंडळ (ठाणे) आणि मुख्य अभियंता तात्याराव नारायणराव मुंडे यांना कृष्णा खोरे सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी १ नोव्हेंबर रोजी पदोन्नती देण्यात आली होती. ती आज रद्द करण्यात आली असून ते पूर्वीच्या मुख्य अभियंता पदावर कायम राहतील, असा आदेश जलसंपदा विभागाने आज काढला.बढत्यांमधील आरक्षणाचा राज्य शासनाचा जीआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता पण स्वत:च्या या आदेशाला १२ आठवड्यांची स्थगितीदेखील दिली होती. ही मुदत २७ आॅक्टोबर रोजी संपली. २८ तारखेला सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या विशेष अनुमती याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशास कोणतीही स्थगिती दिली नाही. त्यानंतर १ नोव्हेंबरला जलसंपदा विभागाने दोन मुख्य अभियंत्यांना कार्यकारी संचालक म्हणून पदोन्नती देण्याचा आदेश काढला.सर्वच प्रकारच्या पदोन्नतींना १३ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने २ नोव्हेंबर रोजी काढला. या पार्श्वभूमीवर, तात्याराव मुंडे आणि रसिक चौहान यांची पदोन्नती रद्द करण्यात येत असल्याचा जीआर जलसंपदा विभागाने आज काढला.त्या प्रकरणी उलटसुलट चर्चाकार्यकारी संचालक म्हणून दोघांना दिलेली पदोन्नती सहाच दिवसांत रद्द करण्याची नामुष्की जलसंपदा विभागावर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे आदेश निघाले होते. ते काढून घेताना मुख्यमंत्र्यांना न्यायालयीन प्रकरणाची नेमकी कायदेशीर बाजू सांगण्यात आली नव्हती का या बाबत आता उलटसुलट चर्चा आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय