कृषी सहाय्यकांना लवकरच पदोन्नती
By Admin | Updated: April 8, 2015 01:11 IST2015-04-08T01:11:12+5:302015-04-08T01:11:12+5:30
राज्यातील कृषी सहाय्यकांना कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर पदोन्नती देताना चारही कृषी विद्यापीठाच्या पदवीधारकांबरोबरच

कृषी सहाय्यकांना लवकरच पदोन्नती
मुंबई : राज्यातील कृषी सहाय्यकांना कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर पदोन्नती देताना चारही कृषी विद्यापीठाच्या पदवीधारकांबरोबरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त वद्यापीठाच्या पदवीधारकांनाही दिली जाईल, अशी माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत दिली.
भाजपाचे रामनाथ मोते यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून पदवी घेतलेल्या पदवीधारकांना पदोन्नतीमध्ये डावलले जात असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना कृषीमंत्री म्हणाले की, १२ डिसेंबर २००६ च्या शासन निणर्यानुसार अध्यापकीय पदे वगळून इतर पदांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व पदवी आणि पदविका पात्र ठरवल्या असून शासकीय नोकऱ्यात मुक्त विद्यापीठाच्या पदवीधारकांना डावलेले जात नाही. कृषी सहाय्यकांना कनिष्ठ संशोधन सहाय्यय या पदांवर पदोन्नती देताना इतर कृषी विद्यापीठाचे पदविधारक आणि मुक्त विद्यापीठाचे पदवीधारक असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. मुक्त विद्यापीठामधून पदवी घेतलेल्या कृषी सहाय्यकांनाही कनिष्ठ संशोधन सहाय्यकपदी पदोन्नती देण्याबाबत कृषी परिषदेने सकारात्मक अहवाल दिला आहे. सदर प्रकरण सध्या सामान्य प्रशासन विभागाकडे आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे खडसे यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)