शेतक-यांनी आत्महत्या करणार नाही असे वचन द्यावे - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: November 24, 2014 17:49 IST2014-11-24T17:49:19+5:302014-11-24T17:49:19+5:30
शेतक-यांनी आत्महत्या करणार नाही असे वचन द्यावे अशी भावनिक साद घालत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधील शेतक-यांशी संवाद साधला.
शेतक-यांनी आत्महत्या करणार नाही असे वचन द्यावे - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. २४ - शेतक-यांनी आत्महत्या करणार नाही असे वचन द्यावे अशी भावनिक साद घालत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधील शेतक-यांशी संवाद साधला. शिवसेना नेहमीच शेतक-यांसोबत असून विरोधी पक्ष म्हणून आम्ही शेतक-यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासनही त्यांनी शेतक-यांना दिले.
उद्धव ठाकरे सोमवारपासून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावर आहेत. सोमवारी या दौ-याची सुरुवात त्यांनी नांदेडमधून केली. बाभुलगाव येथील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमचा हा दौरा 'पीपली लाइव्ह'सारखा नसून आम्ही थेट मैदानात उतरुन परिस्थितीची माहिती करुन घेतो असा टोलाही त्यांनी एकनाथ खडसेंच्या दुष्काळग्रस्त भागातील दौ-याला उद्देशून लगावला आहे.