केंद्र सरकारच्या निर्यात बंदीमुळे गडगडले डाळिंबाचे भाव

By Admin | Updated: September 2, 2014 03:04 IST2014-09-02T03:04:29+5:302014-09-02T03:04:29+5:30

डाळिंबाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी आणल्यामुळे डाळिंबाचे भाव घसरले आहेत.

Prolonged pomegranate prices due to the ban on exports by the central government | केंद्र सरकारच्या निर्यात बंदीमुळे गडगडले डाळिंबाचे भाव

केंद्र सरकारच्या निर्यात बंदीमुळे गडगडले डाळिंबाचे भाव

बुलडाणा : डाळिंबाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी आणल्यामुळे डाळिंबाचे भाव घसरले आहेत. एरव्ही 1क्क् ते 12क् रुपये प्रतिकिलो भावाने विकले जाणारे डाळिंब आता ठोक बाजारपेठेत 2क् ते 6क् रुपये प्रति किलोर्पयत आल्याने डाळिंब उत्पादक शेतक:यांना फटका बसला
आहे.
 गत काही वर्षामध्ये शेतक:यांचा फलोत्पादनाकडे कल वाढला असून, विदर्भात फळांच्या लागवडीत डाळिंबाला सर्वाधिक पसंती आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून बाजारात डाळिंबाची आवक वाढली असून, भावही चांगला होता.
15 ऑगस्टपासून निर्यातबंदी
निर्यातक्षम डाळिंब साधारणपणो 12क् ते 125 रुपये प्रतिकिलो दराने बाजारपेठेत विकले जात होते; मात्र 15 ऑगस्टपासून डाळिंबावर निर्यातबंदी आल्याने बाजारपेठेत डाळिंबाची आवक वाढली आहे. 
पंधरा दिवसांपूर्वी चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे भाव 8क् ते 6क् रुपयांर्पयत घसरले होते. आता हे भाव 45 रुपयांर्पयत उतरले आहेत. निर्यातबंदी नसती, तर डाळिंबाला चांगला भाव मिळाला असता, असे डाळिंब उत्पादकांचे मत
आहे.
 
4विदर्भात आता डाळिंबाची शेती मोठय़ा प्रमाणात होत असून, एकटय़ा बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 8क्क् हेक्टर क्षेत्रवर लागवड करण्यात आली आहे. निर्यातबंदीमुळे डाळिंबाला उठाव नसल्याने भाव घसरले आहेत. सध्या ठोक बाजारपेठेत 45 ते 5क् रुपये प्रतिकिलो या भावाने चांगल्या प्रतीचे डाळिंब विकले जात आहेत.
- टी.डी.अंभोरे, जिल्हाध्यक्ष,
डाळिंब उत्पादक संघ, बुलडाणा
 
4डाळिंब लागवडीत मिळणारा नफा लक्षात घेऊन उत्पादन घेतले; मात्र गत पंधरा दिवसांत डाळिंबाचे भाव उतरले. गत हंगामात 2क्क् रुपये किलोर्पयत भाव होता. आता मात्र 45 रुपये किलोने विकावे लागत आहेत.
- ज्ञानेश्वर गायकवाड,
डाळिंब उत्पादक शेतकरी,
गिरडा, ता.बुलडाणा

 

Web Title: Prolonged pomegranate prices due to the ban on exports by the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.