डोंबिवली स्फोटाचा फलकांद्वारे निषेध

By Admin | Updated: June 27, 2016 02:31 IST2016-06-27T02:31:14+5:302016-06-27T02:31:14+5:30

मिलापनगर रहिवासी वेल्फेअर असोसिएशनने मृतांच्या नातलगांना केवळ दोन लाखांची मदत देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करणारे फलक लावले.

Prohibition by Dombivli bomb blast | डोंबिवली स्फोटाचा फलकांद्वारे निषेध

डोंबिवली स्फोटाचा फलकांद्वारे निषेध


डोंबिवली : प्रोबेस कंपनीतील स्फोटाला रविवारी एक महिना पूर्ण झाला. यानिमित्ताने मिलापनगर रहिवासी वेल्फेअर असोसिएशनने मृतांच्या नातलगांना केवळ दोन लाखांची मदत देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करणारे फलक लावले.
मे महिन्याच्या २६ तारखेला प्रोबेस कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात १२ जणांना आपले जीव गमवावे लागले. या घटनेला महिना उलटायला आला तरी मृतांच्या नातेवाइकांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत सरकारने जाहीर केलेली नव्हती. ‘लोकमत’ने याला वाचा फोडताच शुक्रवारी डोंबिवलीत झालेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमादरम्यान मृतांच्या नातेवाइकांना २ लाखांची मदत सरकारच्या वतीने जाहीर केली. मात्र, मिलापनगर रहिवासी वेल्फेअर असोसिएशन या संघटनेने रविवारी सर्वत्र फलक लावून या तुटपुंज्या भरपाईबद्दल सरकारचा निषेध केला. १२ जण मृत्युमुखी पडले. त्यांना फक्त २ लाखांची मदत, मालमत्तेचे नुकसान झालेल्या रहिवाशांना भरपाई मिळणार का? स्फोटाला जबाबदार सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? चौकशी अहवाल कधी मिळणार? डोंबिवलीत आणखी स्फोट होण्याची आपण वाट बघताय का? असे सवाल त्यांनी सरकारला केले आहेत.
कारखानदारांनी घेतली सुरक्षेची प्रतिज्ञा
उत्पादकांची संघटना म्हणून कारखान्यांतील तसेच आजूबाजूच्या परिसरातील माणसांच्या सुरक्षेसाठी पुन्हा समर्पित आहोत. सुरक्षेबाबत प्रसार करण्यासाठी आणि असे अपघात पुन्हा होणार नाहीत, यासाठी मालक, अधिकारी आणि कामगार यांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. भविष्यात असे अपघात होऊ नयेत, म्हणून आम्ही अतीव काळजी घेऊ.

Web Title: Prohibition by Dombivli bomb blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.