कुलगुरू शोधप्रक्रियेला गती
By Admin | Updated: March 19, 2015 23:59 IST2015-03-19T23:59:04+5:302015-03-19T23:59:41+5:30
निवड प्रक्रियेला प्रारंभ : अंतिम मुदत २० एप्रिल; त्रिसदस्यीय समितीचे आवाहन

कुलगुरू शोधप्रक्रियेला गती
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. राज्यपालांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय शोधसमितीने इच्छुक अर्हता असलेल्यांना अर्ज पाठविण्याचे आवाहन केले आहे. अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत २० एप्रिल आहे.गेल्या आठवड्यात राजभवनातून विद्यापीठ कुलगुरू शोधसमितीच्या अध्यक्षपदाची नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली. समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन हे असून, त्यांच्यासह उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे आणि विद्यापीठ प्रतिनिधी रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांचा समितीत समावेश आहे. समिती अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर अनेक इच्छुकांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या जाहिरातीची प्रसिद्धी समितीने बुधवारी केली. त्यात राज्य सरकारने २७ मे २००९ मध्ये कुलगुरूपदासाठी निश्चित केलेल्या अर्हता आणि अनुभव या अटींची पूर्तता करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांकडून नामनिर्देशन अथवा निवेदने पाठविण्याचे आवाहन समितीने केले आहे.
अर्हता आणि सविस्तर
तपशील, अर्जाचा नमुना (६६६.४ल्ल्र२ँ्र५ं्न्र.ंू.्रल्ल) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व्यक्तींनी स्वत:चा तपशीलवार, गोषवारा, उमेदवारीचे दोन पानी समर्थन, विद्यापीठासाठी दोन पानी भविष्यलक्षी योजना आणि स्वत:च्या कामांची ओळख असलेल्या तीन नामवंत व्यक्तींचे संदर्भ, नाव आणि पत्त्यांसहित सादर करावेत. संस्थांनाही योग्य उमेदवारांची नावे पाठविण्याची परवानगी असणार आहे. शोधसमितीने डॉ. बी. चंद्रशेखर यांना संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. (प्रतिनिधी)
इच्छुक लागले तयारीला
तत्कालीन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांची मुदत संपण्यापूर्वीच
दोन महिन्यांपासून कुलगुरूपदासाठी इच्छुक असलेल्या प्राचार्य, प्राध्यापकांनी तयारीला सुरुवात केली. मागीलवेळी असलेले निकष, पात्रता, आदींनुसार अर्ज, बायोडाटा, व्हीजन तयार केले आहे. आता शोधसमितीकडून जाहिरात प्रसिद्ध झाल्याने संबंधित इच्छुक अर्ज ‘अपडेट’ करण्याच्या तयारीला लागले आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
संपर्क अधिकारी डॉ. बी. चंद्रशेखर यांच्याकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज चार प्रतीत, तसेच त्याची संगणकीकृत प्रत (ुूँंल्ल१िं२ी‘ं१@१ूु.१ी२.्रल्ल)
२० एप्रिलला अथवा त्यापूर्वी पोहोचेल, अशारीतीने कुलसचिव, रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, एन.सी.आर. बायोटेक सायन्स क्लस्टर, ३ माईलस्टोन, फरिदाबाद-गुरगाव एक्स्प्रेस वे, पोस्ट आॅफिस बॉक्स ३, फरिदाबाद-१२१००१, हरियाणा या पत्त्यावर पाठवावेत. या मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती समितीने दिली आहे.