भांडुपमध्ये ‘सुुपर स्पेशालिटी’ची वेगाने उभारणी : मुख्यमंत्री

By Admin | Updated: June 13, 2014 03:09 IST2014-06-13T03:09:49+5:302014-06-13T03:09:49+5:30

मुंबई पूर्व उपनगर भांडुप येथील नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी वेगाने पावले उचलली जातील.

Progress in 'Super Specialty' in Bhandup: CM | भांडुपमध्ये ‘सुुपर स्पेशालिटी’ची वेगाने उभारणी : मुख्यमंत्री

भांडुपमध्ये ‘सुुपर स्पेशालिटी’ची वेगाने उभारणी : मुख्यमंत्री

मुंबई : मुंबई पूर्व उपनगर भांडुप येथील नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी वेगाने पावले उचलली जातील. या हॉस्पिटलसाठी १५० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
मनसेचे शिशिर शिंदे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. हे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय सप्टेंबर २०१३मध्ये झाला होता. मुंबईचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि राज्य शासन यांच्यात बैठकही झाली. हॉस्पिटलची इमारत उभारण्यासाठी खासगी विकासकाकडून महापालिकेने भूखंडही ताब्यात घेतला. त्यानंतर बांधकामाचे प्रारुपासाठी जाहिराती देण्यात आल्या. प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आणखी निविदा काढण्यात आली. चालू वर्षी २ कोटी रुपयांची तरतूद या हॉस्पिटलसाठी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या हॉस्पिटलचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी शिशिर शिंदे आणि प्रवीण दरेकर यांनी लावून धरली. आपण स्वत: शिशिर शिंदे, महापालिकेचे अधिकारी यांच्यासह जागेची पाहणी करू तसेच बैठक देखील घेऊ, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिले. शिंदे यांच्या मतदारसंघातील छत्रपती शिवाजी तलावाचे कामसुरू करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Progress in 'Super Specialty' in Bhandup: CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.