मोदींचा दौरा आल्यावर तयारीच्या कामाला गती

By Admin | Updated: August 17, 2014 00:48 IST2014-08-17T00:48:19+5:302014-08-17T00:48:19+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्याची प्राथमिक स्वरूपाची तयारी प्रशासनाकडून सुरू असली तरी दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम आल्यावरच त्याला अधिक गती येण्याची शक्यता आहे.

Progress in preparation for Modi's tour | मोदींचा दौरा आल्यावर तयारीच्या कामाला गती

मोदींचा दौरा आल्यावर तयारीच्या कामाला गती

२१ तारखेला नागपूर जिल्ह्यात
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्याची प्राथमिक स्वरूपाची तयारी प्रशासनाकडून सुरू असली तरी दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम आल्यावरच त्याला अधिक गती येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आदी व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याचा कार्यक्रम साधारणपणे दोन आठवड्यापूर्वी येतो. सुरक्षेच्या तयारीची तजवीज त्यानुसार केली जाते. प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती तयारी केली जाते. मोदी यांचा दौरा २१ तारखेला नागपूर जिल्ह्यात आहे.
मौदा आणि नागपूरमध्ये कस्तूरचंद पार्कवर त्यांचे कार्यक्रम आहेत. मात्र अद्याप त्यांचा अधिकृत दौरा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. शनिवारी दिवसभर या कार्यक्रमाची वाट होती. सायंकाळपर्यंत तो आला नव्हता. मात्र येत्या काही दिवसात तो यण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने प्राथमिक तयारी यापूर्वीच सुरू केली आहे. अधिकृत दौरा प्राप्त झाल्यानंतर अधिकृतपणे कामाला सुरुवात होईल व प्रशासनाच्या तयारीला गती येईल, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नागपूरचे खासदार व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी रविवारी नागपूर येथे येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दौऱ्याबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Progress in preparation for Modi's tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.