शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात औद्योगिक विकासाला गती

By admin | Updated: December 21, 2014 00:13 IST

हिवाळी अधिवेशनात विदर्भातील औद्योगिक विकासाच्या गंभीर मुद्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने मिहानसह नागपुरातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीकडे

मुख्यमंत्र्यांच्या घोषणांमुळे उद्योजक उत्साही : मिहानला बुस्टनागपूर : हिवाळी अधिवेशनात विदर्भातील औद्योगिक विकासाच्या गंभीर मुद्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने मिहानसह नागपुरातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीकडे देशभरातील उद्योजकांचा कल वाढला आहे. सध्या नागपुरातील औद्योगिक क्षेत्राचे चित्र बदलत आहे. भारताच्या औद्योगिक नकाशावर नागपूरची वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये गणना होऊ लागल्याने उद्योजकांमध्ये उत्साह संचारला आहे. सीएटचे भूमिपूजनटायर निर्मितीच्या सीएट प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यात बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील जमीन हस्तांतरणाचे सोपास्कार पार पाडले आणि अधिवेशनातच भूमिपूजनही झाले. या प्रकल्पात विदर्भातील २८०० जणांना रोजगार मिळेल. शिवाय भूमिपूजनानंतर लगेचच स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. विस्तारीकरणात रोजगाराची द्वारे पुन्हा खुली होतील. मिहानमधील विजेचा प्रश्न सुटलामिहानमध्ये काही महिन्यांपासून प्रलंबित विजेचा पुरवठा आणि महत्त्वपूर्ण वीजदराचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातल्याने सुटला. त्यामुळे मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी स्थानिक, राज्य आणि देशभरातील उद्योजक उत्सुक आहेत. नामांकित उद्योजकांनी एमएडीसीकडे विचारणा केल्याची माहिती आहे. १५० ते २०० ते एकर जागेवर स्थानिक उद्योजकांनी फूड पार्क उभारण्याची तयारी चालविली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जागेची मागणीही केली आहे. एवढ्या मोठ्या जागेवर तब्बल १५० ते २०० जणांना आधुनिक उद्योजकांची उभारणी करण्याची संधी आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’मुळे उद्योजक प्रभावितमहाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या आवश्यक पायाभूत सुविधांसोबतच गतिमान निर्णयप्रकिया आणि उद्योगस्नेही वातावरणाची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच ‘मेक इन महाराष्ट्र’संदर्भात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याबाबत जे विधायक निर्णय घेतले, त्याबद्दल उपराजधानीतील बहुतांश उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे. अमेरिकन उद्योजक मिहानमध्ये गुंतवणुकीस उत्सुक‘मेक इन महाराष्ट्र’मुळे अमेरिकन उद्योजक प्रभावित झाले. अमेरिकेचे महावाणिज्यदूत थॉमस वाडा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील २२ प्रमुख उद्योगसमूहांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची रामगिरीवर भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व सुविधायुक्त मिहानमध्ये आणि महाराष्ट्रात कुठेही उद्योग उभारण्याचे आवाहन त्यांना केले होते. चर्चेदरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही उद्योजकांना मिहानमध्ये गुंतवणुकीचे आवाहन केले आहे.आयटी कंपन्यांमध्ये अनेकांना संधीमिहान-सेझ येथे परसेप्ट वेब सोल्युशन्स या सॉफ्टवेअर कंपनीचे रविवारी उद्घाटन झाले. विदर्भातील २५० तरुणांना रोजगाराच्या संधी आहेत. शिवाय मिहानमध्ये सुरू असलेल्या २२ कंपन्यांमध्ये ८ ते १० सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्या आहेत. तिथे अनेकांना रोजगार मिळाला आहे. तसेच निर्यातही वाढल्याने गुंतवणूकदारांचा कल वाढतो आहे. मिहान-सेझमध्ये कार्यान्वित होणारी परसेप्ट ही आयटी क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. भविष्यात जागा खरेदी करून विस्तारीकरणाचा मानस आहे. (प्रतिनिधी)