शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील प्राध्यापक मंगळवारपासून बेमुदत संपावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 20:11 IST

राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने , ११ सप्टेंबर रोजी एक दिवसांचा संप आदी मार्गांनी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने काहीच दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देसातवा वेतन आयोग लागू करावा, थकित ७१ दिवसांचे वेतन मिळावे आदी मागण्याशिक्षणमंत्री विनोद तावडे व उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणारशासनाने काहीच दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय

पुणे : राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयातीलप्राध्यापक विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि. २५ सप्टेंबर) पासून बेमुदत संप पुकारला आहे. प्राध्यापकांच्या एमपुक्टो संघटनेने हा संप पुकारला आहे.  महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढवावे, अभ्यास मंडळांमधील नियुक्त्यांमध्ये झालेला गोंधळ दूर करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, थकित ७१ दिवसांचे वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.एमपुक्टो संघटनेच्यावतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांनी राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने , ११ सप्टेंबर रोजी एक दिवसांचा संप आदी मार्गांनी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने काहीच दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.  शहरातील सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक यामध्ये मोठया संख्येने सहभागी होतील असा विश्वास पुटाचे (पुणे युनिव्हसिटी टिचर्स असोसिएशन) अध्यक्ष एस. एम. राठोड यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान यापूर्वी संघटनेकडून ७१ दिवसांचा बेमुदत संप केला होता, त्यावेळी त्याला कमी पाठिंबा मिळाला होता. त्याचबरोबर शासनाने त्या ७१ दिवसांचे वेतन प्राध्यापकांना अदा केले नव्हते, त्यामुळे काही प्राध्यापक या आंदोलनापासून दूर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ......................चर्चेसाठी बोलावलेएमपुक्टो संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभुमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी दुपारी ३ वाजता मंत्रालयात बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे व उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयProfessorप्राध्यापकStrikeसंपGovernmentसरकारEducationशिक्षण