शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातांवर नियंत्रणासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 01:55 IST

वाढते रस्ते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यू व जखमींच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.

- जमीर काझीमुंबई : वाढते रस्ते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यू व जखमींच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. रस्ते सुरक्षेबाबतचे कामकाज आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अखत्यारीत स्वतंत्र विभागाद्वारे हाताळले जाणार आहे. त्यासाठी पाच वरिष्ठ अधिकाºयांसह एकूण २१ अधिकाºयांची नेमणूक करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.राज्य सेवेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या प्रतिनियुक्तीने आणि बाह्य संस्थेमार्फत (आउटसोर्सिंग) या विभागातील पदे भरली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या शीर्ष संस्थेची स्थापना करण्यात आली आहे, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.देशभरात रस्ते अपघातांतून होणाºया मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात २०१२ साली दाखल झालेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीत अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश केंद्र व सर्व राज्यांना दिले आहेत. रस्त्यावरील सुरक्षा हा विषय प्राधान्याने हाताळण्यात यावा, असे निर्देश ३० नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या अंतिम निकालपत्रात दिले होते. त्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यासाठी सर्व राज्यांना ३१ जानेवारी २०१८ पर्यंत मुदत दिली होती. त्यांनी सुचविलेल्या सूचनेनुसार परिवहन विभागाने पहिल्यांदा २९ डिसेंबर २०१७ रोजी प्रस्ताव तयार केला होता. त्यातील त्रुटी दूर करून पुन्हा गेल्या वर्षी १६ मार्चला नव्याने प्रस्ताव बनविण्यात आला. मुख्य सचिव दिनेश जैन यांनी पदनिर्मितीला मंजुरी देत त्याबाबतचे पत्र २७ डिसेंबरला गृह विभागाकडे सादर केले होते. त्यानुसार राज्य सरकारने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे.११ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरणारनव्या रचनेनुसार या विभागाने रस्ते सुरक्षाविषयक राज्यस्तरीय कामकाज हाताळावयाचे आहे. त्यासाठी नवीन २१ पदे बनविण्यात आली आहे. त्यामध्ये साहाय्यक परिवहन आयुक्त, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता व जनसंपर्क अधिकारी ही पदे प्रतिनियुक्तीने भरली जातील. तर रस्ता सुरक्षा सुपरवायझरची पाच, क्लार्कची चार आणि अधीक्षक व शिपाई ही ११ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.ं

टॅग्स :Accidentअपघात