‘कौन्सिलिंग’ची प्रक्रिया १७ जूनपासून
By Admin | Updated: June 17, 2014 00:50 IST2014-06-17T00:50:29+5:302014-06-17T00:50:29+5:30
‘डीएमईआर’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ मेडिकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च) संचालित करण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

‘कौन्सिलिंग’ची प्रक्रिया १७ जूनपासून
वैद्यकीय अभ्यासक्रम : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राहणार विभागीय केंद्र
नागपूर : ‘डीएमईआर’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ मेडिकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च) संचालित करण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार १७ जूनपासून विभागीय केंद्रांवर ‘कौन्सिलिंग’ करण्यात येणार आहे. संपूर्ण विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे विभागीय केंद्र राहणार असल्याी माहिती देण्यात आली आहे.
८ मे रोजी ‘एमएच-सीईटी’ परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच घोषित झाला. त्यानुसार यातील गुणांनुसार आता प्रवेशप्रक्रियेला प्रत्यक्षपणे सुरुवात होणार आहे. विद्यार्थी १६ जून म्हणजेच सोमवारपासून ‘डीएमईआर’च्या संकेतस्थळाहून माहिती पुस्तिका ‘डाऊनलोड’ करू शकतात. विद्यार्थ्यांच्या राज्यनिहाय गुणवत्ता क्रमानुसार प्रत्यक्षपणे विभागीय केंद्रांवर ‘कौन्सिलिंग’साठी उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अर्जात पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात येईल. १७ ते २१ तारखेपर्यंत ८०९६ विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येतील. २० व २१ जून या तारखांना केवळ आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांनीच उपस्थित रहावे, अशी सूचना देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गात राज्य गुणवत्ता यादीत ४११० क्रमांकापर्यंतच्या उमेदवारांनाच बोलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पसंतीक्रम अर्ज भरण्याचे वेळापत्रक
(सर्व वर्ग-प्रवर्गांसाठी)
१७ जून १ ते ५५० सकाळी ९ वाजता ५५१ ते १२०० दुपारी २ वाजता
१८ जून १२०१ ते १८५० सकाळी ९ वाजता १८५१ ते २६०० दुपारी २ वाजता
१९ जून २६०१ ते ३२५० सकाळी ९ वाजता ३२५१ ते ४११० दुपारी २ वाजता
(केवळ आरक्षित वर्गासाठी)
२० जून ४१११ ते ५००० सकाळी ९ वाजता ५००१ ते ६००० दुपारी २ वाजता
२१ जून ६००१ ते ७००० सकाळी ९ वाजता ७००१ ते ८०९६ दुपारी २ वाजता
संक्षिप्त वेळापत्रक
विभागीय केंद्रांवर पसंतीक्रम अर्ज भरणे - १७ ते २१ जून
पहिल्या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची यादी- २५ जून
दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरणे - तारीख नंतर घोषित होणार
दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची यादी- २७ जुलै
तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची यादी- १० सप्टेंबर