शहरं
Join us  
Trending Stories
1
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
2
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
3
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
4
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
5
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
6
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
7
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
8
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
9
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
10
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
11
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
12
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
13
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
14
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
15
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
16
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
17
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
18
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
19
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
20
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट

‘सारथी’मध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा अडथळा : मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 12:47 IST

‘कोपर्डीतील गुन्हेगारांना त्वरित फाशी द्यावी

ठळक मुद्देसंस्था सुरू होऊन अवघे १० महिने झालेले असताना त्यांच्याकडे मागील ३ वर्षांचा मागितला ताळेबंदप्रशिक्षणाबरोबरच संशोधन, शिष्यवृत्ती असे उपक्रम बंद करण्याचे काढले परिपत्रक सर्वोच्च न्यायालयात असलेला मराठा आरक्षणाबाबतचा खटला २२ जानेवारीला सुनावणीला येणार

पुणे : मराठा तरुणांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या सारथी या संस्थेत काही सरकारी अधिकारी खोडा घालत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला. सरकार स्थापन होण्यासाठीच्या राजकीय घाईगर्दीत या अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला असल्याचे क्रांती मोर्चाचे म्हणणे आहे. राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर यांनी ही माहिती दिली. कुंजीर म्हणाले, ‘‘क्रांती मोर्चाच्या मागणीवरून सरकारने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रश्क्षिण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापन केली. ही स्वायत्त संस्था आहे. सरकारने दिलेल्या निधीतून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. संस्था सुरू होऊन अवघे १० महिने झालेले असताना त्यांच्याकडे मागील ३ वर्षांचा ताळेबंद मागितला. प्रशिक्षणाबरोबरच संशोधन, शिष्यवृत्ती असे उपक्रम बंद करण्याचे परिपत्रक काढले. हा सर्व प्रकार सरकारमधील काही अधिकारी जाणीवपूर्वक करत आहेत. याच उद्देशाने स्थापन झालेल्या अन्य संस्थांना मात्र प्रशासनाकडून जास्त निधी, जास्त साह्य केले जात असते.’’कोणते अधिकारी? असे विचारले असता कुंजीर यांनी या विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, उपसचिव रवींद्र गुरव यांची नावे घेतली. मध्यंतरी सरकार तयार करण्याची राजकीय गडबड होती. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे व अन्य काही मंत्री नियुक्त झाले; मात्र मंत्र्यांना अद्याप खाती दिली गेलेली नाहीत. त्यामुळे सर्व खात्यांचा कामकाज मुख्यमंत्रीच पाहत आहेत. त्यांना कसलीही कल्पना न देता हे परिपत्रक काढले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना माहिती देणारच आहोत; पण त्याआधी या विषयाबाबत जागृती व्हावी, यासाठी ही माहिती जाहीर करत आहोत, असे कुंजीर यांनी सांगितले.यावेळी तुषार काकडे, सचिन आडेकर, गणेश मापारी, नीलेश सांगळे, हनुमंतराव मोटे, व्यंकटेश बोडखे उपस्थित होते. सारथीबाबत घेतलेले सर्व निर्णय त्वरित मागे घ्यावेत, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लगेचच सुरू करावी, शिक्षक भरतीसाठी असलेल्या टीईटी या नव्या परीक्षेसंदर्भात असलेली ५ टक्के गुणांची सवलत राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, सर्वोच्च न्यायालयात असलेला मराठा आरक्षणाबाबतचा खटला २२ जानेवारीला सुनावणीला येणार असून, त्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांची नियुक्ती करावी  अशा मागण्या या वेळी केल्या. याची दखल घेतली गेली नाही, तर मराठा क्रांती मोर्चाला पुन्हा रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.....‘कोपर्डीतील गुन्हेगारांना त्वरित फाशी द्यावीमराठा क्रांती मोर्चाचे संघटन कोपर्डी बलात्कार प्रकरणावरून झाले. यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली असून त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ती लवकर निकाली काढून आरोपींना फाशी द्यावी; अन्यथा हैदराबादच्या पोलिस चकमकीसारखे प्रकरण होईल, असे या वेळी सांगण्यात आले. यावर आरोपींना असे मारण्याला तुमचे संघटना म्हणून समर्थन आहे का? या प्रश्नावर कुंजीर यांनी, आम्ही तसा विचार अद्याप केलेला नाही, असे सांगितले. जनभावना महत्त्वाची असते व न्याय मिळण्यास विलंब होऊ नये असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाGovernmentसरकार