शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर कलचाचणीला घेण्यास अडचणी : मुख्याध्यापक संघ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 12:06 IST

शाळांनी मोबाईल अ‍ॅपवर १८ डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत कलचाचणी घ्यावी,अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.

ठळक मुद्देसंगणकावर चाचणी घेण्यास द्यावी परवानगीगेल्या चार ते पाच दिवसात राज्यातील ४ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची कलचाचणी एका मुलाची कलचाचणी घेण्यासाठी दोन-दोन तास पालघर ,ठाणे यासारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईलला इंटरनेट कनेक्ट होण्यास अडचणी

पुणे : राज्यातील ग्रामीण व दूर्गम भागातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘अ‍ॅनरॉईड’ मोबाईल उपलब्ध होत नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी केवळ ‘ मोबाईल अ‍ॅप’वरच न घेता; संगणकावरही घेण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी मोबाईल अ‍ॅपवर घेतली जात आहे.शाळांनी मोबाईल अ‍ॅपवर १८ डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत कलचाचणी घ्यावी,अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील व ग्रामीण भागातील शाळांनी कलचाचणी घेण्यास सुरूवात केली आहे.त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसात राज्यातील ४ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात कलचाचणी घेण्यास अडचणी येत असल्याची तक्रार मुख्याध्यापक संघातर्फे राज्य मंडळाकडे करण्यात आली आहे.राज्याचे मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड म्हणाले, पालघर ,ठाणे यासारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईलला इंटरनेट कनेक्ट होण्यास अडचणी येत आहेत. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेसे ‘अ‍ॅनरॉईड’मोबाईल उपलब्ध होत नाहीत. एका मुलाची कलचाचणी घेण्यासाठी दोन-दोन तास जात आहेत. विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा दोन महिन्यांवर आली आहे. मात्र,विद्यार्थी व शिक्षकांचा वेळ ‘मोबाईल अ‍ॅप’वर परीक्षा देण्यात जात आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने संगणकवरही कलचाचणी घेण्यास परवानगी द्यावी,याबाबत राज्य मंडळाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा केली आहे.परंतु,अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.परंतु,मागील वर्षाप्रमाणे यंदाही संगणकावर कलचाचणी घेण्यास परवानगी द्यावी.-----------------------महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी आत्तापर्यंत १७ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.त्यातील ४ लाख विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली आहे.सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल अ‍ॅपवर कलचाचणी घेण्यात आली.त्यावेळी कोणतीही अडचण आली नाही.तसेच सध्या विद्यार्थी मोबाईल अ‍ॅपवर कलचाचणी देण्याचा आनंद घेत आहेत.ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल अ‍ॅपवर चाचणी देता येणार नाही, त्यांच्याबाबत कोणता निर्णय घ्यावा,हे नंतर ठरविले जाईल. - शकुंतला काळे,अध्यक्ष,राज्य मंडळ ----------------पुणे जिल्ह्यातील शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात अडचणी येत असल्याची तक्रार सध्या तरी मुख्याध्यापक संघाकडे प्राप्त झालेली नाही.मोबाईलवर कलचाचणी घेणे अवघड जात असल्याचे दिसून आल्यास याबाबत राज्य मंडळाकडे पाठपुरावा केला जाईल.- हरिश्चंद्र गायकवाड,अध्यक्ष ,मुख्याध्यापक संघ,पुणे 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा