भुजबळांच्या अडचणी वाढल्या
By Admin | Updated: June 23, 2015 02:35 IST2015-06-23T02:35:03+5:302015-06-23T02:35:03+5:30
आर्थिक गैरव्यवहारात अडकलेले राजकीय नेते छगन भुजबळ यांचा पाय अधिकच खोल रुतत असल्याचे दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयाने आज

भुजबळांच्या अडचणी वाढल्या
मुंबई : आर्थिक गैरव्यवहारात अडकलेले राजकीय नेते छगन भुजबळ यांचा पाय अधिकच खोल रुतत असल्याचे दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयाने आज भुजबळ यांच्या मुंबई व नवी मुंबईतील सहा मालमत्तावर छापे घालत त्यांच्यावर फेमाचे उल्लंघन केल्याचा तसेच मनी लाँड्रीगचा गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी छापा टाकण्यात आलेल्या सहा मालमत्तांपैकी दोन मेसर्स चमणकर एंटरप्राईजच्या आहेत. (महाराष्ट्र सदनाचे कंत्राट मिळविण्यासाठी यानीच लाच दिली होती) एक मालमत्ता राजेश मिस्त्री यांची असून (भुजबळ कुटुंबीयांना पैसा हस्तांतरित करण्यासाठी विकासकानी नेमलेला माणूस) या छाप्यात बेलापूरच्या युवराज शेट्टीचे नाव पुढे आले. बेलापूर येथे त्याच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला. शेट्टी घरातून चार कंपन्या चालवत असून, त्याने परवेश कन्स्ट्रक्शनचे शेअर्स जादा किंमत देऊन विकत घेतले होते. शेट्टीच्या घरातून काही कागदपत्रे जमा करण्यात आली असून, त्याच्या छाननीचे काम चालू आहे, असे सक्तवसुली संचालनालयाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)