मुंबई : नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी विधान परिषदेतील चर्चेदरम्यान मंगळवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मंत्र्यांविरोधात केलेल्या आरोपांविराधात भाजपा सदस्य प्रवीण दरेकर, भाई गिरकर आणि सुजितसिंह ठाकूर यांनी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे विशेषाधिकार भंगाची सूचना दाखल केली आहे. राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांने एका क्लास वन महिला अधिकाऱ्याशी वाईट वर्तन केले, असा आरोप राणे यांनी केला होता. (प्रतिनिधी)
राणेंविरोधात विशेषाधिकार भंगाची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 05:23 IST