शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

...खासगी विमान माघारी फिरले, तानाजी सावंतांच्या मुलाचं ‘बेपत्ता’नाट्य; काय घडला घटनाक्रम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:17 IST

चार्टर्ड प्लेनने मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता, गोंधळानंतर परत आला

पुणे - शिंदेसेनेचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचा पुणे पोलिस कंट्रोल रूमला फोन आला अन् संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त यांना फोन केल्याने पोलिस यंत्रणेवर दबाव निर्माण झाला. चार्टर्ड विमानाने सावंत यांचे चिरंजीव  ऋषिराज सावंत बँकॉकला जात होते. 

मात्र वडिलांच्या अपहरणाच्या संशयामुळे त्यांचे विमान पुण्याकडे फिरवावे लागले. अवघ्या ५ तासांत ऋषिराज परत आला. दिवसातून १५ ते २० फोन होतात. त्यात अचानक हा एअरपोर्टवर कशाला गेला? या विचाराने मी अस्वस्थ झालो होतो, असे सावंत म्हणाले. 

इतरांचीही चौकशी होणारऋषीराज सावंत आणि त्यांचे दोन मित्र हे नेमके कोणत्या कारणासाठी बाहेर चालले होते? याची माहिती आम्ही जाणून घेणार आहोत. ही माहिती पुढील चौकशीत समोर येईल. ऋषीराज सावंतच्या बरोबरील व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

काय घडला घटनाक्रम? सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ऋषिराज सावंत हे एका स्विफ्ट कारमध्ये बसून विमानतळावर गेले होते. त्यानंतर अचानक ते बेपत्ता झाल्याची बातमी पसरली. तानाजी सावंत यांनी थेट पोलिस आयुक्तांचे कार्यालय गाठले. दरम्यान, कंट्रोल रूमला माहिती मिळाली की, तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेले आहे. त्यानंतर यंत्रणा सतर्क झाली. माहिती घेतली असता ऋषिराज चार्टर्ड विमानाने बँकॉकला जात असल्याचे समोर आले.  एटीसीकडून पायलटला विमान परत पुण्याला घेऊन येण्याबाबत सांगण्यात आले. रात्री नऊच्या सुमारास विमान पुन्हा लोहगाव विमानतळावर लँड झाले.

माजी मंत्र्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचा फोन सोमवारी दुपारी नियंत्रण कक्षाला आला. पुण्याहून ऋषिराज खासगी विमानाने गेल्याचे कळले. आम्ही विमानतळ प्रशासनाशी बोलून, काही तासांतच त्यांचे विमान लोहगाव विमानतळावर आणले. मित्रांची चौकशी केल्यानंतरच अधिक माहिती मिळेल.रंजनकुमार शर्मा, सहपोलिस आयुक्त

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंत