खासगी पार्ट्यांनाही परवानगी आवश्यक

By Admin | Updated: December 30, 2014 02:26 IST2014-12-30T02:26:14+5:302014-12-30T02:26:14+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असून, ३१ डिसेंबरचा दिवस कसा साजरा करायचा याचेही प्लॅनिंग झाले आहे.

Private parties also require permission | खासगी पार्ट्यांनाही परवानगी आवश्यक

खासगी पार्ट्यांनाही परवानगी आवश्यक

थर्टी फर्स्टच्या जल्लोषावर नजर : पार्ट्या, हॉटेल, रेस्टॉरंटची होणार तपासणी
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असून, ३१ डिसेंबरचा दिवस कसा साजरा करायचा याचेही प्लॅनिंग झाले आहे. मात्र खासगी पार्ट्या करीत असाल तर तुम्हाला अन्न आणि औषध प्रशासनाचा (एफडीए) एक दिवसाचा परवाना आवश्यक आहे. भोजन तयार करण्याची जबाबदारीदेखील परवानाधारक केटररलाच द्यावी लागेल अन्यथा अशा पार्ट्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.
नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष पार्ट्या आयोजित करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. तसेच मित्र-परिवारासह शहर हद्दीलगत अथवा एखाद्या खासगी ठिकाणीही मेजवाणीचे आयोजन करण्यात येते. शिवाय नागरिक घरगुती मेजवानीही आयोजित करीत असतात. यासाठी केक, पाव असे बेकरी पदार्थ मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. विविध प्रकारच्या चॉकलेटचीदेखील यादरम्यान मोठ्या प्रमाणावर विक्री होते. नागरिकांना मिळणारे खाद्यपदार्थ दर्जेदार असावेत यासाठी एफडीएने नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थ तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

केटरर्सला कंत्राट दिल्यास परवाना गरजेचा
एखाद्या ठिकाणी खासगी पार्टीसाठी एकत्र जमून मेजवाणीचा बेत असेल तर नागरिकांनी एक दिवसाचा परवाना घ्यावा. छायाचित्र असलेले ओळखपत्र, दोन फोटो व १०० रुपये फी भरल्यास लगेच परवाना देण्यात येतो. त्यासाठी नागरिकांनी एफडीएच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. एखाद्या केटरर्सला मेजवानीचे कंत्राट दिले असेल तर तो परवानाधारक असल्याची नागरिकांनी खात्री करावी.
- शिवकुमार कोडगिरे, सहआयुक्त, एफडीए

Web Title: Private parties also require permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.