खासगी रुग्णालये रडारवर
By Admin | Updated: April 28, 2016 03:19 IST2016-04-28T03:19:42+5:302016-04-28T03:19:42+5:30
शहरातील अनेक गृहनिर्माण रुग्णालयांमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे.

खासगी रुग्णालये रडारवर
नवी मुंबई : शहरातील अनेक गृहनिर्माण रुग्णालयांमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अग्निशमन नियमांना हरताळ फासणाऱ्या रुग्णालयांच्या विरोधात धडक कारवाई करण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे.
शहरातील अनेक खासगी गृहनिर्माण सोसायट्या आणि वाणिज्य संकुलांना आग प्रतिबंधक नियमांचे वावडे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एखादी आगीची घटना घडल्याने तारांबळ उडते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी शहरातील जवळपास साडेचारशे गृहनिर्माण सोसायट्यांना अग्निशमन विभागाने नोटिसा बजावून आगप्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित आहेत की नाही याची माहिती मागविली होती. त्यानंतर आता या विभागाने शहरातील रुग्णालयांकडे आपला मोर्चा वळविला आहे. शहरात जवळपास अडीचशे रुग्णालये आहेत. नियमानुसार रुग्णालय सुरू करण्यापूर्वी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. परंतु शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारे आगप्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत अग्निशमन विभागाने दिले आहेत.विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)